रेल्वेतून उडी मारुन मुलीची आत्महत्या.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 24, 2023

रेल्वेतून उडी मारुन मुलीची आत्महत्या..

 रेल्वेतून उडी मारुन मुलीची आत्महत्या..


वडिलांसह सावत्र आईकडून दिल्या जाणार्‍या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून एका 17 वर्षीय मुलीने धावत्या रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केली आहे. अश्विनी चव्हाण (वय -17, रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडिल नामदेव चव्हाण, सावत्रआई लक्ष्मी चव्हाण, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात सुरवातीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा गुन्हा येरवडा पोलिस ठाण्यात पुढील तपसासाठी वर्ग करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण कुटूंबिय अनेक वर्षांपासून येरवडा परिसरात राहायला आहे. नामदेवला पहिल्या पत्नीपासून मुलगी झाली होती. मात्र, त्याने लक्ष्मीसोबत लग्न केले होते. 2014 पासून दोघेही अश्विनीला शारिरीक व मानसिक त्रास देत होते. दरम्यान, तिघेही रेल्वेतून प्रवास करीत होते.पालकांच्या त्रासाला कंटाळून अश्विनीने दौंडच्या हद्दीत रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment