नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोण होणार ? हे आ. लंकेच ठरवणार ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 24, 2023

नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोण होणार ? हे आ. लंकेच ठरवणार !

 नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष कोण होणार ? हे आ. लंकेच ठरवणार !

नाट्यमय घडामोडीनंतर अखेर नगराध्यक्ष विजय औटी यांचा राजीनामा..

पारनेर - 
पारनेर नगरपंचायतच्या ठरलेल्या सव्वा वर्षाच्या कार्यकालानंतर नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्षा सौ .सुरेखा अर्जुन भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला . विजय औटी यांनी प्रथम राजीनामा देण्यास नकार दिला असल्याची चर्चा होती मात्र नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राजीनामा  सुपूर्त केला . दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत गटनेतेपदी योगेश मते यांची निवड करण्यात आली.
पारनेर नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती बाजार समिती निवडणुकीनंतर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले होते .आमदार निलेश लंके यांच्या सूचनेनुसार सव्वा वर्षासाठीच्या पदाचा कार्यकाल ठरवला होता . त्यानुसार दि.23 रोजी सकाळी सुरेखा भालेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नगराध्यक्ष विजय औटी हे प्रथम राजीनामासाठी तयार नसल्याची चर्चा होती .नगराध्यक्ष विजय औटी राजीनामा देण्यास विलंभ करत असल्याचे चित्र दिसल्यामुळे विरोधकांमध्ये मोर्चे बांधणीला व चर्चेला उत आला होता .पारनेर शहरवासीय तसेच आमदार निलेश लंके यांचे विरोधक नगरपंचायत मध्ये सत्तांतर होणार या आशयाच्या चर्चा व कुजबुज संपूर्ण पारनेर शहरासह तालुक्यात सुरू असताना आमदार निलेश लंके यांच्या यशस्वी राजकीय खेळीमुळे विरोधकांच्या सर्व आराखड्यांच्यावर पाणी पडल्याचे चित्र पहावयास मिळाले . 
संध्याकाळी 4 च्या सुमारास नगराध्यक्ष विजयराव औटी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा आपल्या पदाचा राजीनामा दिला व आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या गट नोंदणी मध्ये सदस्य म्हणून हजर झाले .आपल्या पदाचा राजीनामा नगरपालिका विभागाचे सह आयुक्त प्रशांत खांडगेकर यांच्याकडे दिला दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीच्या गटनेते पदासाठी बैठक पार पडली आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनानुसार नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांच्या नावावर गटनेते म्हणून शिक्कामार्फत झाले गटनेते पदाचे पत्र सह आयुक्त प्रशांत खांडकेकर यांच्याकडे देण्यात आले असून जिल्हाधिकारी निवडणूक प्रशिक्षणाच्या कामकाजामुळे उपलब्ध नसल्याने नगरपालिका विभागाचे सह आयुक्त खांडगेकर यांनी राजीनामा व गटनेते पदाचा अर्ज स्वीकारला असून त्यावर जिल्हाधिकारी निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या गटातील नगरसेवक प्रियंका सचिन औटी विजय सदाशिव औटी विद्या बाळासाहेब कावरे सुरेखा अर्जुन भालेकर हिमानी रामजी नगरे भूषण उत्तम शेलार नीता विजय औटी नितीन रमेश अडसूळ सुप्रिया सुभाष शिंदे अशोक फुलाजी चेडे योगेश अशोक मते अशा अकरा जणांची गट नोंदणी करण्यात आली आहे.
पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची गट नोंदणी करण्यात आली आहे यात अपक्षांसह भाजपचे नगरसेवक अशोक चेडे  सहयोगी सदस्य म्हणून आपल्या नावाचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यानुसार 11 सदस्यांचे गट नोंदणी करण्यात आली असून गटनेते पदी पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांची निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.

नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष राजीनामा नंतर रिक्त झालेल्या पदांसंदर्भात निवडणूक प्रक्रिया होणार असून राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष कोण होणार हे आमदार निलेश लंके ठरवणार असून या महत्त्वाच्या पदासाठी कुणाची वर्णी लागणार याकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.


No comments:

Post a Comment