रेल्वे स्टेशन परिसरात तरुणाचा खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 16, 2023

रेल्वे स्टेशन परिसरात तरुणाचा खून.

 रेल्वे स्टेशन परिसरात तरुणाचा खून.


पुणे रेल्वे स्टेशन परिसरात एका 30 ते 35 वयोगटातील तरुणाचा डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केलेला मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. सदर खून झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुण हा फिरस्ता असल्याचा संशय असून याबाबत पोलिस शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तक्रार दाखल केली आहे. पुणे स्टेशन परिसरातील मालधक्का परिसरात मारुती मंदिराजवळ एक तरुण रक्ताच्या थाराेळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पाेलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. अज्ञाताने तरुणाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला हाेता. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. मधाळे पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment