14 वर्षीय मुलीवर तब्बल 50 वेळा सामुहिक अत्याचार; धक्कादायक माहिती समोर.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 14, 2023

14 वर्षीय मुलीवर तब्बल 50 वेळा सामुहिक अत्याचार; धक्कादायक माहिती समोर..

 14 वर्षीय मुलीवर तब्बल 50 वेळा सामुहिक अत्याचार; धक्कादायक माहिती समोर..


छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. या गुन्ह्यातील काही आरोपींना अटकही करण्यात आली, तर सहा जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पीडितेवर तब्बल ५० वेळा अत्याचार झाल्‍याची धक्कादायक बाब समोर आली असून तपास अधिकाऱ्यांनी सदर माहिती न्यायालयात सादर केली आहे.

अक्षय प्रकाश चव्हाण (वय १९, रा. डोणगाव तांडा ता. पैठण), शेख बबलू शेख लतिफ ऊर्फ असीम पठाण (एचपी) (२४, रा. जमालनगर, देवळाई) आणि रामेश्वर अंबादास गायकवाड (२२, रा. अलोकनगर, बीड बायपास सातारा परिसर, मूळ रा. मानेगाव खालसा, रामनगर, जि. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे असून आरोपींच्या पोलिस कोठडीत १६ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांनी मंगळवारी (ता.१३) दिले.

गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांपैकी अक्षय चव्हाण याने वापरलेली इंडिका कार डोणगाव (ता. पैठण) येथून हस्तगत करण्यात आली. त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी अल्पवयीन साथीदाराची असल्याचे अक्षयने सांगितले.

रामेश्वर गायकवाड याने दुचाकी गुन्ह्यात वापरल्याची कबुली दिली मात्र ती कोठे ठेवली याची माहिती त्याने दिली नाही. याशिवाय आरोपी शेख बब्बू शेख लतीफ याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी शेख हुसेन (रा. देवळाई) याच्याकडे असल्याचे पोलिसांना सांगितले.

No comments:

Post a Comment