ओव्हरटेक करताना दुचाकींची‎ समोरासमोर धडक; 2 जण ठार‎. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 14, 2023

ओव्हरटेक करताना दुचाकींची‎ समोरासमोर धडक; 2 जण ठार‎.

 ओव्हरटेक करताना दुचाकींची‎ समोरासमोर धडक; 2 जण ठार‎.


छत्रपती संभाजीनगर-जळगाव या‎ राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी‎ रस्त्यावर चिंचखेडा ते केऱ्हाळा‎ फाट्यादरम्यान दोन‎ मोटारसायकलींची समोरासमोर‎ धडक हाेऊन दोन जणांचा मृत्यू‎ झाला. ही घटना रात्रीच्या‎ सुमारास घडली. विठ्ठल गजानन‎ जाधव (६२, रा. सातारा परिसर, जि.‎ छत्रपती संभाजीनगर) व जय‎ साईनाथ गायकवाड ( १८, रा. चौका,‎ ता. फुलंब्री ) अशी अपघातातील‎ मृतांची नावे अाहेत. विठ्ठल जाधव हे‎ रात्री सिल्लोडहून छत्रपती‎ संभाजीनगरकडे मोटारसायकलने जात होते,‎ तर जय गायकवाड हा‎ माेटारसायकलीने सिल्लोडकडे येत होता.

चिंचखेडा ते केऱ्हाळा फाट्यादरम्यान‎ या दोन्ही मोटारसायकलींची‎ समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही‎ मोटारसायकलस्वार गंभीर जखमी‎ झाले. नागरिकांनी सिल्लोड‎ उपजिल्हा रुग्णालयात जखमींना‎ ‎ दाखल केले. येथे त्यांच्यावर‎ ‎ प्राथमिक उपचार करून पुढील‎ ‎ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर‎ घाटी रुग्णालयात दाखल केले असता‎ डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.‎ विठ्ठल जाधव यांच्या पश्चात पत्नी,‎ मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे‎ असा परिवार आहे. वडोदबाजार‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्याची प्रक्रिया सुरू होती

No comments:

Post a Comment