लाच‎ घेणारा मनपातील लिपिक जाळ्यात.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 14, 2023

लाच‎ घेणारा मनपातील लिपिक जाळ्यात..

लाच‎ घेणारा मनपातील लिपिक जाळ्यात.


गुंठेवारी फाइल लवकर‎ मंजूर करून देण्यासाठी ५ हजारांची‎ लाच घेणारा मनपातील लिपिक‎ गजानन रामकिशन सर्जे (३३)‎ ‎ याला‎ ‎ लाचलुचपत‎ ‎ प्रतिबंधक‎ ‎ विभागाच्या‎ ‎ पथकाने रंगेहाथ‎ ‎ पकडले.‎ यासंबंधी तक्रारदाराने ८ जून रोजी‎ एसीबीकडे तक्रार केली.‎

तक्रारदाराने त्यांच्या मालकीचा‎ प्लॉट क्र. ४ गट नंबर ९९ तरोडा खु.‎ नांदेड येथील मालमत्तेचे नियमाधीन‎ गुंठेवारी मिळवण्यासाठी दोन‎ वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये अर्ज‎ केला होता. परंतु, त्यांच्या अर्जावर‎ कार्यवाही होत नव्हती. लिपिक‎ गजाननने पंचासमक्ष ५ हजार रुपये‎ लाचेची मागणी केली व पंचासमक्ष‎ लाच स्विकारली.‎

No comments:

Post a Comment