नगर शहरातील घटना! या कारणामुळे पतीने केले पत्नीवर चाकुने वार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 1, 2023

नगर शहरातील घटना! या कारणामुळे पतीने केले पत्नीवर चाकुने वार..

 नगर शहरातील घटना! या कारणामुळे पतीने केले पत्नीवर चाकुने वार..


अहमदनगर -
पती पत्नीच्या वादातून पतीने पत्नीवर सप्पासप भाजी कापण्याचा चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पत्नी स्मिता सुनील सांगळे (रा. नामदेव चौक, पाईपलाईन रोड, सावेडी) या गंभीर जखमी असून पती सुनील तात्याबा सांगळे (रा. नामदेव चौक, पाईपलाईन रोड, सावेडी) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1 जून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास सदर घटना घडली. फिर्यादीचा पती सुनील याला दारूचे व्यसन आहे. तो नेहमी काहीतरी कारणावरून फिर्यादीला सतत त्रास देत वाद निर्माण करत असतो. बुधवारी सकाळी आठ वाजता फिर्यादी व त्यांचा पती सुनील व मुले घरी असताना सुनीलने घरात ठेवलेली दारू पिऊन वाद घालण्यास सुरूवात केली.
घराच्या दरवाजाला आतुन कडी कुलूप लावून घेतले व शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. तुला आज जिवंत सोडणार नाही, असे म्हणून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने घरातील चाकू घेऊन अंगावर वार केले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

No comments:

Post a Comment