नगरपालिका कचरा डेपोमुळे जनजीवन विस्कळीत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 1, 2023

नगरपालिका कचरा डेपोमुळे जनजीवन विस्कळीत.

 नगरपालिका कचरा डेपोमुळे जनजीवन विस्कळीत.


श्रीगोंदा -
श्रीगोंदा नगर परिषदेने घनकचरा प्रकल्प लवकर सुरू करावा तसेच श्रीगोंदा शहरात प्लास्टिक बंदी करावी या मागणीसाठी निवासी  तहसीलदार निलेश वाघमारे यांना संभाजी ब्रिगेड चे निवेदन श्रीगोंदा नगरपरिषद घनकचरा प्रकल्प गट क्रमांक १६२९ श्रीगोंदा येथे बऱ्याच दिवसापासून उभारलेला आहे महाराष्ट्र शासनाने श्रीगोंदा नगर परिषदेसाठी घनकचरा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांच्या मशनरी उपलब्ध करून दिलेले आहेत २०१७ मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला आज २०२३ उजाडले आहे तरीपण एकही मशीन या ठिकाणी चालू अवस्थेत नाही नगर परिषदेची उदासीनता यातून लक्षात येत आहे हा प्रकल्प मागेच चालू झाला असता तर लाखो टन कचरा जळून खाक झाला नसता  या परिसरामध्ये प्रदूषण झाले नसते हा प्रकल्प लवकरात लवकर चालू व्हावा असे निवेदन नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांना दिलेले आहे दिनांक पाच सहा २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता संभाजी ब्रिगेड व स्थानिक नागरिक कचरा डेपो ला टाळे ठोकू आंदोलन करणार आहे श्रीगोंदा नगर परिषदेवर असणार आहे असे निवेदन देण्यात आलेले आहे निवेदन देताना संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नाना शिंदे उपाध्यक्ष सागर हिरडे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment