प्रेयसीच्या २० वर्षीय मुलीला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; तरुणीचा मृत्यूशी संघर्ष. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 1, 2023

प्रेयसीच्या २० वर्षीय मुलीला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; तरुणीचा मृत्यूशी संघर्ष.

 प्रेयसीच्या २० वर्षीय मुलीला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; तरुणीचा मृत्यूशी संघर्ष.


मुंबई :
 धारावीमध्ये एका २० वर्षांच्या तरुणीला जिवंत जाळल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. मोहिनी असे या तरुणीचे नाव असून नंदकिशोर पटेल (४२) असं तिला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. नंदकिशोर पटेल हा मोहिनीच्या आईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची माहिती आहे. धारावी पोलिसांनी नंदकिशोर याला अटक केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, धारावीच्या राजीव गांधी नगरात राहणारी मोहिनी रात्री घराबाहेर बसली होती. याचवेळी या ठिकाणी असलेल्या नंदकिशोर याने तिच्यासोबत क्षुल्लक कारणावरून भांडण उकरून काढले. सोबत आणलेली पेट्रोलची बाटली त्याने रागाच्या भरात मोहिनी हिच्या अंगावर ओतली आणि तिला जाळले. या घटनेत ५० टक्क्यांहून अधिक भाजलेल्या मोहिनीला तिच्या कुटुंबियांनी सायन रुग्णालयात दाखल केले.
धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदकिशोर आणि पीडित मोहिनी हिची आई काजल जैस्वार हे अनेक वर्षांपासून एकत्र राहत होते. मोहिनी ही त्यांची दत्तक मुलगी होती. मात्र मागील काही महिन्यांपासून नंदकिशोर आणि काजल यांच्या नात्यात दुरावा आला होता. मोहिनीचा मुलीप्रमाणे सांभाळ करुनही ती माझ्यासोबत नीट वागत नसल्याचा राग नंदकिशोरच्या मनात होता. त्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी नंदकिशोरने पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मोहिनी हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या आईने नंदकिशोर याच्याविरोधात तक्रार दिली असून या तक्रारीवरून नंदकिशोर याच्यावर पोलिसांकडून हत्येचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment