नगर जिल्ह्यातील घटना; प्रेमप्रकरणात मदत केल्याच्या संशयातून मुलीचा खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 1, 2023

नगर जिल्ह्यातील घटना; प्रेमप्रकरणात मदत केल्याच्या संशयातून मुलीचा खून.

नगर जिल्ह्यातील घटना; प्रेमप्रकरणात मदत केल्याच्या संशयातून मुलीचा खून.
अहमदनगर - मैत्रीणीस प्रियकरासोबत पळून जाण्यास मदत केल्याचा संशयातून साकेगाव येथील हनुमान नगर तांड्यावरील 18 वर्षीय तरुणीला लोखंडी पाईप व रॉडने मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली आहे. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वप्निल धोंडिराम राठोड़, मनीषा सुरेश चव्हाण दोन्ही (रा. हनुमाननगर तांडा, साकेगाव ता.पाथर्डी), उषा बबन पवार (रा. खांडके, ता. जि. अहमदनगर), हरेश प्रभाकर पवार (रा. डांगेवाडी ता.पाथर्डी), किरण रामसिंग राठोड, अजय शंकर जाधव, निलेश रमेश राठोड (सर्व रा. साकेगाव ता. पाथर्डी), बबन पवार (पूर्ण नाव माहीत नाही), अभिषेक बबन पवार (दोन्ही रा. खांडके) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तर गीता रमेश राठोड असे मयत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकेगाव येथील हनुमाननगर तांड्यावर मयत मुलीचे शेजारी स्वप्निल धोंडीराम राठोड हा परिवारासमवेत राहतो. राठोड यांची भाची व गीता यांची मैत्री होऊन बोलणे सुरू होते. परंतु काही दिवसांपूर्वी भाची प्रियाकरासोबत पळून गेली. तीला पळून जाण्यास गीता मदत करत असल्याची शंका स्वप्नील राठोड याला येत होती. यातूनच सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास स्वप्निल राठोड, मनीषा सुरेश चव्हाण व उषा बबन पवार रा.खांडके, हे मयत गीताच्या घरी आले व गीताला मोटारसायकलवर घेऊन गेले.
गीता लवकर घरी न आल्याने भाऊ रोहन तिला पाहण्यासाठी गेला. डांगेवाडी येथे स्वप्निल राठोड यांचे नातेवाईक हरिश प्रभाकर पवार यांच्या घरी मयत गीतास मारहाण सुरू होती. यानंतर तांड्याच्या परिसरातील विहिरीत मयत गीताचा मृतदेह आढळून आला. आईच्या फिर्यादीवरून संशयित 9 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे पुढील तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment