मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; अहमदनगर चे नाव बदलले ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 31, 2023

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; अहमदनगर चे नाव बदलले !

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; अहमदनगर चे नाव बदलले ! 
अहमदनगर - अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगरच्या चोंडी येथे आले होते. यानंतरच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरचं नामांतर करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला.
अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अहमदनगरमध्ये ही घोषणा केली. अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी होत होती.

No comments:

Post a Comment