कारचालकाच्या डोक्याला बंदूक लावून 12 लाख रुपये लुटले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 1, 2023

कारचालकाच्या डोक्याला बंदूक लावून 12 लाख रुपये लुटले.

 कारचालकाच्या डोक्याला बंदूक लावून 12 लाख रुपये लुटले.


नांदेड - 
खाद्यतेलाची वसुली करून नांदेडला जाणारी कार दोन दुचाकीवर आलेल्या सहा तरुणांनी रात्री ८.३० च्या सुमारास अडवली. अगोदर वाद घातला, नंतर गाडीच्या काचा फोडल्या व चालकाच्या डोक्याला बंदूक लावून १२ लाखांची रोकड लुटली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील नायगावजवळ घडली.

नांदेड येथील खाद्यतेलाचे व्यापारी रत्नाकर पारसेवार यांचे मुनीम युवराज निवळे व चालक अंकुश खुजडे हे कारने घेऊन नायगाव नरसी व मुखेड येथे मंगळवारी वसुलीसाठी गेले होते.

११ ते १२ लाखांची वसुली करून रात्री नांदेडकडे जात असताना नायगाव तहसील कार्यालयाजावळ पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या सहा तरुणांनी कार अडवून तू आम्हाला कट का मारलास, असा चालकाशी वाद घातला. त्यानंतर कारच्या काचा फोडल्या व चालकाच्या डोक्याला बंदूक लावली व मुनीम युवराज निवळे यांच्या हातातून ११ लाख ८० रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment