दहा वर्षीय मुलीला भरधाव ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 9, 2023

दहा वर्षीय मुलीला भरधाव ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू.

 दहा वर्षीय मुलीला भरधाव ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू.


ठाण्यातील शिळफाटा परिसरात बुधवारी रात्री एका 10 वर्षीय मुलीला भरधाव ट्रकने चिरडले, यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री आठच्या सुमारास मुलगी रस्ता ओलांडत असताना ट्रकने तिला धडक दिली. रोलीराम लवकुश मिश्रा असे मृत मुलीचे नाव आहे. आरोपी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी सागितले की, ही घटना 7 जून रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. शिळफाटा सर्कलजवळ सदर मुलगी ही रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या ट्रकने मुलीला चिरडले. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

No comments:

Post a Comment