तृतीयपंथीयाचा गळा चिरून खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 9, 2023

तृतीयपंथीयाचा गळा चिरून खून.

 तृतीयपंथीयाचा गळा चिरून खून.


वरवंड -
वरवंड येथे दोन दिवसांपूर्वी एका तृतीयपंथीयाचा राहत्या घरात गळा चिरून निघृणपणे खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. ८) सकाळी उघडकीस आली. मात्र, यवत पोलिसांनी काही वेळातच संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सचिन ऊर्फ सोनूदीदी दिनेश जाधव (वय ४०, मूळ, रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या रा. वरवंड), असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत ऊर्फ चंदर शिवाजी जाधव (वय ३०, रा. वरवंड) या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

याबाबत खोली मालक बापू खोमणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी माहिती दिली की, फिर्यादी बापू खोमणे यांच्या एका खोलीत तृतीयपंथी राहत होता. गुरुवारी सकाळी काही जणांना खोलीतून दुर्गंधी आल्याने संशय आला.

याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनेची माहिती मिळतात यवत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, परीविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी रेखा वाणी, संजय नागरगोजे, विजय कोल्हे आदी घटनास्थळी धाव घेतली.

दोन दिवसांपूर्वी हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. यवत पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यामध्ये आरोपीवर संशय बळावला गेल्याने हवालदार संभाजी कदम, गुरू गायकवाड अक्षय यादव, नीलेश कदम आदींच्या पथकाने अवघ्या काही वेळातच आरोपीला अटक केली. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

No comments:

Post a Comment