अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 9, 2023

अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा इशारा.

 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन.


अहमदनगर 
 जिल्‍हयात 8 ते 10 जुन व 12 जुन, 2023  या कालावधीमध्‍ये वीजांच्‍या कडकडाटांसह वादळ व सोसाटयाचा वारा तसेच 11 जुन रोजी  वादळासह हलका ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.  या पार्श्‍वभूमीवर नागरीकांनी आवश्यक ती काळजी व दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी आवाहन केले आहे.

मेघगर्जनेच्‍या वेळीवीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये.

 गडगडाटीच्‍या वादळा दरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्सशेतीची अवजारेमोटारसायकलसायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदानझाडाखालीटॉवर्सध्‍वजांचे खांबविद्युतदिव्‍यांचे खांबधातुचे कुंपणविदयुतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणा-यालोंबणा-या केबल्‍स पासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. वादळी वा-यामुळे घरपत्र्याचे शेड व शेतीमालाचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल तर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे.

नागरीकांनी वादळी वारेवीजगारपीट आणि पाऊस यापासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईलयाबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालयपोलीस स्‍टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्‍हा नियंत्रण कक्षजिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्‍वनी क्र.1077 (टोल फ्री)0241-2323844 अथवा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधावाअसेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment