गावठी कट्ट्यातून गोळी झाडून‎ घेत अभियंत्याची आत्महत्या‎. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 22, 2023

गावठी कट्ट्यातून गोळी झाडून‎ घेत अभियंत्याची आत्महत्या‎.

 गावठी कट्ट्यातून गोळी झाडून‎ घेत अभियंत्याची आत्महत्या‎.


नाशिक रोडजवळील पळसे येथे‎ गावठी कट्ट्यातून डोक्यात गोळी‎ झाडून घेत तरुण अभियंत्याने‎ आत्महत्या केली. या प्रकरणी‎ नाशिकरोड पोलिसांत याबाबत गुन्हा‎ दाखल करण्यात आला.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎ पळसे हद्दीतील दारणातीरावरील‎ भैरवनाथ मंदिराजवळ बुधवारी‎ सकाळी ८ वाजेच्या सुमारास संदीप‎ नाना सहाणे (२९, रा. कृष्णा‎ काॅलनी, भगवा चौक, चेहेडी शिव‎ मंदिर) हा मंदिरात जातो असे‎ पत्नीला सांगून गेला. तो न‎ परतल्याने पत्नीने नातलगांकडे‎ चौकशी केली. त्यानंतर संदीपने‎ स्वत:च गावठी कट्ट्यातून डोक्यात‎ दोन गोळ्या झाडून घेत आत्महत्या‎ केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास‎ आले. मूळचा नळवाडी (ता.‎ सिन्नर) येथील संदीप हा माळेगाव‎ एमआयडीसीतील कंपनीत कामास‎ होता. एक वर्षापूर्वीच त्याचा विवाह‎ झाला होता.‎

संदीप सहाणे याच्याकडे गावठी‎ पिस्तूल कुठून आले, त्याने ते‎ कोणाकडून खरेदी केले. याचा तपास‎ पोलिस करत आहेत.‎

No comments:

Post a Comment