अहमदनगर मधील घटना; तरुणाची चॉपरने वार करुन हत्या.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 9, 2023

अहमदनगर मधील घटना; तरुणाची चॉपरने वार करुन हत्या..

अहमदनगर मधील घटना; तरुणाची चॉपरने वार करुन हत्या..


श्रीरामपूर :
येथील गोंधवणी रोड परिसरात मागील भांडणाच्या कारणातून झालेल्या वादात शुक्रवारी पहाटे चार वाजता दोघा जणांनी तन्वीर शाह या तरुणाची चॉपरने वार करून हत्या केली.
घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाळूच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी पहाटे गोंधवणी रोड परिसरात तन्वीर शाह हा थांबलेला असताना रुपेश शिंदे, सुनिल देवकर या दोघांनी तन्वीर शाह याला अडवून शिवीगाळ केली. यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. शिंदे व देवकर यांनी शाह याच्यावर चॉपरने आठ ते दहा वार करून हत्या केली.
घटनेनंतर दोघेही मारेकरी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सध्या गोंधवणी गावात वातावरण तणावाचे झाल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment