जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 3 एकर क्षेत्रावरील घनवन प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 9, 2023

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 3 एकर क्षेत्रावरील घनवन प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न.

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 3 एकर क्षेत्रावरील घनवन प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न.


सराटेवडगाव -
आनंदवाडी ग्रामपंचायत गावामध्ये आयसीआयसीआय च्या सहकार्याने व तसेच ग्रामपंचायत सहभागतून  महाराष्ट्रतील सर्वात मोठा प्रकल्प 3 एकर क्षेत्रावर घनवन वृक्ष लागवड करण्यात  आले आहे तरी या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा वरिष्ठांच्या उपस्थित पार पडला अध्यक्षस्थानी श्री.अनुज अग्रवाल (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आयसीआयसीआय फाउंडेशन) व प्रमुख उपस्थिती श्रीमती.मोनिका आचार्य मॅडम (झोनल हेड आयसीआयसी फाउंडेशन),श्री.दीपक पाटील सर (प्रोजेक्ट मॅनेजर)श्री.चेतन पाटोळे,श्री.यशवंत बहिरम सर,आदर्श गावचे सरपंच सौ.कोमलताई भिमराव बोडखे, उपसरपंच सौ.उषाताई लहू तरटे, ग्रामपंचायत सदस्य श्री.शिवदास नन्नवरे सर, श्री.बापुराव सुंबरे,श्री.राहुल गजघाट, महिला बचत गटातील अध्यक्ष सचिव यांच्या व सर्व सन्माननीय ग्रामस्थांच्या उपस्थितीत घनवन लोकार्पण सोहळा पार पडला कार्यक्रमाची रूपरेषा व प्रस्तावना कर्तव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.संदीप भाऊ सुंबरे यांनी केले यावेळी बोलताना वन्यजीव, पशु-पक्षांना हक्काचं घर घनवनाच्या माध्यमातून जमिनीची धूप थांबली जाणार आहे,ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण मुक्त परिसर होण्यास तसेच गाव कार्बन न्यूट्रल व्हिलेजच्या दिशेने वाटचालीस सुरुवात झालेली आहे सर्वांना नॅचरल एसी मिळणार आहे. अध्यक्ष साहेबांनी या तीव्र उन्हाळ्यामध्ये घनवन प्रकल्पाचे अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केल्याबद्दल कौतुक व प्रशंसा करून यापुढेही अनेक कामे करण्याचा मानस व्यक्त केला तसेच मान्यवरांचे व ग्रामस्थांचे सरपंचांनी आभार मानले.          
सौ.कोमलताई भिमराव बोडखे
लोकनियुक्त सरपंच आदर्श गाव सराटेवडगाव -आनंदवाडी
उपसरपंच सौ.उषाताई लहू तरटे सर्व ग्रामपंचायत सदस्य.

No comments:

Post a Comment