अहमदनगर मधील घटना; तरुणाचा भरदुपारी झोपेत मृत्यू घात की अपघात चर्चेला उधाण... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 13, 2023

अहमदनगर मधील घटना; तरुणाचा भरदुपारी झोपेत मृत्यू घात की अपघात चर्चेला उधाण...

 अहमदनगर मधील घटना; तरुणाचा भरदुपारी झोपेत मृत्यू घात की अपघात चर्चेला उधाण...


श्रीगोंदा -
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील हॉटेलवर काम करणाऱ्या आचाऱ्याचा झोपेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ८ जून रोजी घडली आहे. शरद रामचंद्र गारोळी वय ३२ असे मयत इसमाचे नाव असून या बाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात हॉटेल मालक गणेश आबासाहेब बारगुजे यांच्या खबरी वरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरी वरून मयत शरद रामचंद्र गारोळी वय ३२ हा  मागील पंधरा दिवसांपासून तालुक्यातील घोटवी येथील गणेश आबासाहेब बारगुजे यांच्या हॉटेल शिवशाही या हॉटेल वर काम करत होता. गुरुवार दि. ८ रोजी दुपारी हॉटेल वरील ग्राहकाची ऑर्डर देऊन तो झोपी गेला. काही वेळाने हॉटेल मालकाने गारोळी याला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुध्द अवस्थेत आढळून आल्याने मालकाने त्याला कोळगाव येथील उपचाराकामी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याच्या उपचारा पूर्वीच हार्टअटॅक ने  मृत्यू झाल्याचे घोषित करत याची माहिती पोलिसांना देत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास बेलवंडी पोलिस करत आहेत.
गणेश बारगुजे यांच्या हॉटेलवर काम करणाऱ्या शरद गारोळी या कामगाराचा मृत्यू मारहाण करत कुकडी केनोल मध्ये टाकल्याने झाल्याची मोठी चर्चा घोटवी परिसरात असून शरद गारोळी या कामगाराचा घात झाली की अपघाती मृत्यू झाला याची कसून चौकशी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी करत आरोपींवर तसेच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी चर्चा होत आहे.

No comments:

Post a Comment