नगर तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणच्या गावठी हातभट्टीवर छापे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 13, 2023

नगर तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणच्या गावठी हातभट्टीवर छापे.

 नगर तालुका पोलिसांची धडक कारवाई, कारवाईत एकुण 6,32,000/- रुपयेचे मुद्देमाल जागीच नाश.

नगर तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणच्या गावठी हातभट्टीवर छापे.


अहमदनगर :
नगर तालुक्यात एकाच दिवशी नेप्ती, निमगाव वाघा खंडाळा येथील पाच ठिकाणच्या गावठी हातभट्टीवर  नगर तालुका पोलिसांनी छापे टाकत  एकुण 6,32,000/- रुपयेचे मुद्देमाल जागीच नाश केला. 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी  शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर ता. पोस्टे यांना नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध गावठी हातभट्टीवर कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक  बी. चंद्रकांत रेड्डी साहेब यांना सोबत घेवून नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करावाई करुन गावठी हातभट्टी अड्डे उध्दवस्त करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार  बी.चंद्रकांत रेड्डी, सहायक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिशिरकुमार देशमुख , सहायक पोलीस निरीक्षक नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी पोउनि रणजित मराग, पोउनि युवराज चव्हाण, पोहेकॉ/शैलेश सरोदे, पोना/सचिन वणवे, राहूल शिंदे महेश भवर मपोना/गायत्री धनवडे पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बारोडे, वैभव काळे, अनिल जाधव व चासफौ/ पठाण यांचे अवैध गावठी हातभट्टी धंद्यावर कारवाई करणेकामी पथक तयार केले. 
त्यानुसार सदर पथकाने नेप्ती, निमगाव वाघा, खंडाळा गावच्या शिवारात जावून विविध पाच ठिकाणी गावठी हातभट्टीवर जावून मोठया प्रमाणात कच्चे रसायण, तयार गावठी हातभट्टी व गावठी हातभट्टी तयार करण्यसाठी लागणारे साहित्य असे एकुण 6,32,000/- मुद्देमाल जागीच नाश करण्यात आला. याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे सदरबाबत वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर,  प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी,  संपतराव भोसले , बी.चंद्रकांत रेड्डी  सहायक पोलीस अधीक्षक सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोउनि रणजित मराग, पोना/सचिन वणवे, राहूल शिंदे, महेश भवर, मपोना/गायत्री धनवडे पोकॉ/कमलेश पाथरुट, संभाजी बारोडे, वैभव काळे, अनिल जाधव व चासफौ/ पठाण यांचे पथकाने केलेली आहे.

No comments:

Post a Comment