वृद्धाश्रमातील मनोरुग्ण महिलेचा खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 13, 2023

वृद्धाश्रमातील मनोरुग्ण महिलेचा खून.

 वृद्धाश्रमातील मनोरुग्ण महिलेचा खून.


ऐरोली सेक्टर- ४ मधील वृद्धाश्रमातील एका मनोरुग्ण महिलेने दुसऱ्या मनोरुग्ण महिलेवर स्टीलच्या ताटाने हल्ला करून तसेच तिला चावा घेऊन तिचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सकाळी ही घटना घडली आहे. रबाळे पोलिसांनी आरोपी मनोरुग्ण महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी महिला मनोरुग्ण असल्याने तिला अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेतील ६० वर्षीय मृत मनोरुग्ण महिला भांडुप येथील राहणारी असून मागील दोन वर्षांपूर्वी ती ऐरोली सेक्टर-४ मधील रो हाऊसमध्ये सुरू असलेल्या स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वृद्धाश्रम राहण्यास आली होती. वृद्धाश्रमातील एका खोलीत या घटनेतील मृत महिलेसह इतर दोन मनोरुग्ण झोपल्या होत्या. त्यानंतर पहाटेच्या सुमारास ६५ वर्षीय मनोरुग्ण महिलेने आपल्या सोबत असलेल्या दोन्ही महिलांवर स्टीलच्या ताटाने हल्ला केला.

हल्ल्याच्या प्रकारामुळे एका महिलेने स्वच्छतागृहात डांबून घेतले. त्यानंतर ६५ वर्षीय मनोरुग्ण महिलेने झोपेत असलेल्या सोबतच्या ६० वर्षीय महिलेवर स्टीलच्या ताटाने हल्ला चढवत तिला चावा घेतला. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ १ चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे, सहायक आयुक्त डी. डी. टेळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. डी. ढाकणे, पोलिस निरीक्षक बी. एन. औटी यांनी घटनास्थळी भेट दिली.

No comments:

Post a Comment