धक्कादायक घटना! 14 वर्षीय मुलीला दारू पाजली; डोंगरावर नेत 6 जणांकडून अत्याचार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 10, 2023

धक्कादायक घटना! 14 वर्षीय मुलीला दारू पाजली; डोंगरावर नेत 6 जणांकडून अत्याचार.

 धक्कादायक घटना! 14 वर्षीय मुलीला दारू पाजली; डोंगरावर नेत 6 जणांकडून अत्याचार.


छत्रपती संभाजीनगर :
 १४ वर्षीय मुलीला बळजबरीने दारु पाजून डोंगर परिसरात तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील सहा आरोपींपैकी तिघांना सातारा पोलिसांनी अटक केली, तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश अतुल उबाळे यांनी शुक्रवारी (ता.९) दिले. या प्रकरणात दोघा विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले.

अक्षय प्रकाश चव्हाण (१९, रा. डोणगाव तांडा ता. पैठण), शेख बबलु शेख लतिफ उर्फ असीम पठाण (एचपी) (२४, रा. जमालनगर, देवळाई) आणि रामेश्वर अंबादास गायकवाड (२२, रा. अलोकनगर, बीड बायपास सातारा परिसर, मुळ रा. मानेगाव खालसा, रामनगर, जि. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात १४ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार, मैत्रिणीने पीडितेची अल्पवयीन आरोपीसोबत ओळख करून दिली. त्याने दुसऱ्या एका तरुणाशी पीडितेची ओळख करून दिली. ते दोघेही पीडितेशी मोबाइलवरून बोलायचे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये अल्पवयीन मुलाने पहाटे दोनला पीडितेला कॉल केला. तिला घराबाहेर बोलावून घेतले. तेव्हा आरोपी अक्षय चव्हाण आणि अल्पवयीन मुलगा तेथे होते. त्यांनी पीडितेला साई टेकडी परिसरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. अश्लील फोटो काढले.

मार्च-एप्रिल २०२३ मध्ये असीम पठाण (एचपी) याने अशाच प्रकारे पहाटे दीड वाजता फोन करून बोलावले आणि देवळाई रोडच्या बाजुला असलेल्या एका घरी नेऊन अत्याचार केला. दुसऱ्या वेळी त्याने त्याच्या मित्राला सोबत घेऊन दोघांनी अत्याचार केला. त्यानंतर राम गायकवाड याने आणि त्याच्या मित्राने बळजबरी अत्याचार केले.

त्यानंतर पुन्हा एकदा राम गायकवाड याने पीडितेवर अत्याचार केला. अल्पवयीन मुलांसह तब्बल सहा जणांनी पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

No comments:

Post a Comment