अपहरण करून खून; गुन्ह्यात फिर्याद दिल्याच्या रागातून खून करून मृतदेह फेकला रस्त्यावर.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 10, 2023

अपहरण करून खून; गुन्ह्यात फिर्याद दिल्याच्या रागातून खून करून मृतदेह फेकला रस्त्यावर..

 अपहरण करून खून; गुन्ह्यात फिर्याद दिल्याच्या रागातून खून करून मृतदेह फेकला रस्त्यावर..


बंदुकीचा धाक दाखवल्या प्रकरणी‎ पोलिस ठाण्यात फिर्याद देत अटक‎ करण्यास भाग पाडल्याप्रकरणी राग मनात ‎ ‎ धरून माळकरंजा (ता. कळंब ) येथील‎ एकाचे नातेवाईकांसमोरून अपहरण‎ केले. नंतर दगड-धोंड्याने डोक्यात वार‎ करून मृतदेह मंगरूळ शिवारात रस्त्यावर‎ फेकला. ही घटना गुरूवारी सायंकाळी‎ सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी‎ ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे.

दरम्यान, मृताच्या नातेवाइकांनी‎ कारवाईच्या मागणीसाठी तब्बल १३ तास‎ मृतदेह ताब्यात घेतला नाही. यामुळे‎ दिवसभर कळंब येथील उपजिल्हा‎ रुग्णालयासमोर तणाव होता.‎ माळकरंजा येथे गुरूवारी सायंकाळी सहा‎ वाजेच्या सुमारास महादेव हीरा काळे,‎ सरदार उमराव चव्हाण, अनिता बादल‎ चव्हाण, सोनाबाई सरदार चव्हाण‎ ओट्यावर गप्पा मारत बसले होते. तेव्हा‎ एक जीप व अन्य दोन चारचाकीवाहने‎ तेथे आली. काळे यांच्या घराजवळ‎ उतरून ओट्यावर बसलेल्या महादेव‎ हीरा काळे याला "उचला रे याला‎ गाडीत टाका, काय होईल ते होईल,‎ याचा मर्डरच कारायचा'' असे म्हणून‎ चार ते पाच जणांनी पकडले.‎ महादेवने प्रतिकार केला असता डोके,‎ छाती, पायावर मारहाण केली. नंतर‎ जीपमध्ये बसवून त्याचे अपहरण‎ केले. सर्वजण तिन्ही वाहनांमधून‎ निघून गेले. नंतर मारहाण करून‎ महादेव काळे याचा मृतदेह मंगरुळ‎ पाटीजवळ बस थांब्याच्या समोरील‎ बाजुला टाकला. या प्रकरणी विकास‎ बब्रु काळे, सूरज राजेंद्र पवार, गंगाराम‎ बापू पवार, बबलु राजेंद्र पवार, बप्पा‎ ऊर्फ खाज्या रामराजे पवार रवी काळे‎ याचा मुलगा व अन्य तिघे असे नऊ‎ जणांच्या विरोधात याप्रकरणी‎ शिराढोण पोलिस गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment