विद्यार्थ्यांनी स्व कर्तुत्वावर पुढे यावे - खा.डॉ.सुजय विखे पाटील. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 9, 2023

विद्यार्थ्यांनी स्व कर्तुत्वावर पुढे यावे - खा.डॉ.सुजय विखे पाटील.

 विद्यार्थ्यांनी स्व कर्तुत्वावर पुढे यावे - खा.डॉ.सुजय विखे पाटील.


पारनेर -
आई वडील यांच्या परिस्थितीचा  विचार करून मुलांनी पुढील शिक्षणाचा विचार करावा आणि ज्या क्षेत्रात आवड आहे , ज्या क्षेत्राची माहिती आहे त्यातच पुढे शिक्षण घ्यावे असे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ते पारनेर येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिर कार्यक्रमात बोलत होते. 
यावेळी व्यासपीठावर विश्वनाथ कोरडे, वसंतराव चेडे, राहुल शिंदे पाटील, बाळासाहेब पठारे , भाजपा तालुकध्यक्ष सुनील थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना विखे म्हणाले की शासनाने तरुणांसाठी खास करियर शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरात दहावी बारावी नंतर काय, या बाबत सविस्तर माहिती दिले जाते ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी आई वडिलांवर शिक्षणाचा बोजा टाकू नये असे सांगितले. विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून या करिता एक मोठी इंटर्नस परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी देखील आपण सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करताना यातील ३०० गुणवंत विद्यार्थ्यांना MPSC व UPSC परीक्षेसाठी तज्ञ प्राध्यापक यांच्या कडून विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. 
विद्यार्थ्यांनी आपल्या गरजेचा देखील विचार करून कौशल्य पूर्ण प्रशिक्षण घ्यावे असे सांगताना सध्या कौशल्य पूर्ण शिक्षणाची नितांत गरज असून यातून चांगली कमाई आहे याकडे ही लक्ष द्यावे असे सांगितले. या करियर शिबिरात विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती , शिवाय विविध तंत्र शिक्षणाच्या संधी बाबत उपस्थित तज्ञ प्रशिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
शिबिरास युवराज पठारे, प्राचार्य एसव्ही जाधव, शिक्षक, विद्यार्थी,ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment