पारनेर भूमी अभिलेख कार्यालयात एजंटचा सुळसुळाट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 23, 2023

पारनेर भूमी अभिलेख कार्यालयात एजंटचा सुळसुळाट.

 पारनेर भूमी अभिलेख कार्यालयात एजंटचा सुळसुळाट.

पारनेर तालुका मनसेचा आरोप..


पारनेर -
पारनेर येथील भुमिअभिलेख कार्यालयामध्ये खाजगी एजंट असून कागदपत्रे जर गहाळ झाली तर त्याला कोणाला जबाबदार धरणार तसेच तालुक्यातील कोर्ट वाटप प्रकरणे प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर मार्गी लावावे या व आदी मागणीचे निवेदन पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्यालय सहाय्यक भास्कर वाघमोडे व मिलिंद भिंगारदिवे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी एजंट आहेत  येथे खाजगी लोक काम करत आहेत त्यामुळे कागदपत्रात अफरातफर खाडाखोड झाल्यास खाजगी लोकांना जबाबदार धरले जावे अनेक दिवसापासून कोर्टाचे प्रकरण अवलंबित आहे ते लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे  पारनेर तालुक्यातील भूमी अभिलेखच्या कार्यालयात छताचा स्लॅब खराब झाल्यामुळे ते काम सुरू आहे ते पावसा पूर्वीच होणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही तालुक्याचे रेकॉर्ड रूम येथे असल्याने  रेकॉर्ड भिजण्याची शक्यता आहे सेवानिवृत्त कर्मचारी कार्यालयामध्ये कामे करतात सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कार्यालयात काय काम आहे ते कोणाच्या इशाऱ्याने कार्यालयात काम करतात त्यांना त्याची समज देण्यात यावी या व आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मनसेचे कार्यकर्ते सतीश म्हस्के दिलीप दिवटे दर्शन गायकवाड नितीन लंके संतोष वाबळे आदी उपस्थित होते.

 
पारनेर भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत येथे एजंटचा सुळसुळाट झाला असल्याने रेकॉर्ड गायब होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे. - सतीश म्हस्के,  पारनेर तालुका मनसे नेते.

No comments:

Post a Comment