कोयता गँग पुन्हा सक्रिय! कोयत्याने वार करुन साडेपाच लाख रुपये लुटले.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 5, 2023

कोयता गँग पुन्हा सक्रिय! कोयत्याने वार करुन साडेपाच लाख रुपये लुटले..

 कोयता गँग पुन्हा सक्रिय! कोयत्याने वार करुन साडेपाच लाख रुपये लुटले..


पुणे
 : दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी टेम्पोचालकावर कोयत्याने वार करुन त्यांच्याकडील साडेपाच लाख रुपये लुटले. ही घटना तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ शनिवारी घडली.
या प्रकरणी रियाज चाँदभाई मुलाणी (वय ४१, रा. वाडेबोल्हाई, वाडेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे आठवडे बाजारासाठी फिर्यादी आणि त्यांचा साथीदार राजेंद्र जाधव हे दोघे टेम्पोतून जात होते.
इंद्रायणी पुलाजवळ दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी टेम्पोला दुचाकी आडवी लावून थांबवले. चोरट्यांनी फिर्यादीला मारहाण करुन दंडावर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच, त्यांच्या खिशातील साडेपाच लाख रुपये आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरटे पसार झाले.

No comments:

Post a Comment