नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दुचाकी चोरणारे 2 जण जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 5, 2023

नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दुचाकी चोरणारे 2 जण जेरबंद.

 नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दुचाकी चोरणारे 2 जण जेरबंद.


अहमदनगर :
शहरातील पाईपलाईन रोड सावेडी व गजानन कॉलनी एमआयडीसी परिसरातून दुचाकी चोरी करणा-या दोन चोरट्यांना पकडले. या चोरट्यांकडून 1 लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. उमेश सुरेश खाटीक (वय 24, रा. शास्त्रीनगर, केडगांव, अहमदनगर मुळ रा. पाथरवला, ता. नेवासा) व सुदाम विक्रम जाधव (रा सुलतानपूर ता नेवासा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशानुसार एलसीबी दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार तुषार धाकराव, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, संतोष लोढे, फुरकान शेख, रविंद्र घुगांसे, जालिंदर माने, किशोर शिरसाठ, बाळु खेडकर व चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी एलसीबी टिम’ला माहिती कळवली. पंचाना सोबत घेऊन शास्त्रीनगर, केडगांव या ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. एलसीबी टिम’ने शास्त्रीनगर, केडगांव परिसरात जाऊन संशयित उमेश खाटीक याच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन घराजवळ जाऊन सापळा लावून थांबलेले असताना घराबाहेर वर्णनाप्रमाणे एकजण उभा असलेला दिसला त्यास शिताफीने ताब्यात घेतले. एलसीबी टिम’ने त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव उमेश सुरेश खाटीक (वय 24, रा. शास्त्रीनगर, केडगांव, अहमदनगर मुळ रा. पाथरवला, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले.
संशयीताकडे घरासमोर लावलेल्या चार दुचाकी व त्यांची कागदपत्राबाबत विचारपुस करता त्याने दुचाकी या त्याचा साथीदार सुदाम विक्रम जाधव (रा. सुलतानपुर, खाटकवाडी, ता. नेवासा) असे दोघांनी सिध्दी लॉन्स, गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहमदनगर व पदमावती चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरुन चोरी केल्याची कबुली दिली. त्यास 80 हजार रुपये किंमतीच्या तीन हिरो कंपनीची एचएफ डिलक्स व 20 हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी असा एकूण 1 लाख रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे. आरोपीचा साथीदार सुदाम जाधव याचा पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी जाऊन शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.


No comments:

Post a Comment