जावयाचा सासुरवाडीमध्ये कोयत्याने वार करत खून. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 5, 2023

जावयाचा सासुरवाडीमध्ये कोयत्याने वार करत खून.

 जावयाचा सासुरवाडीमध्ये कोयत्याने वार करत खून.


पुणे - 
पिंपरी चिंचवड शहराजवळील मावळ तालुक्यात गहुंजे येथे भरदिवसा एका तरुणाची शेतात हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूरज काळभोर (२८) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या सासुरवाडीतच त्याचा खून करण्यात आला आहे.

माहितीनुसार, सूरज काळभोर येथे गहुंजे येथील संतोष बोडके यांच्या मुलीशी दीड महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तो आकुर्डी स्टार हॉस्पिटल मागे राहायला होता. त्याची आई महापालिकेच्या दवाखान्यात कामाला होती, तर सूरज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नोकरी करत होता. त्याला वडील नसून आई, पत्नी सोबत तो राहत होता. रविवारी तो गहुंजे येथील सासुरवाडीत आला होता. त्यावेळी शेतात फिरत असताना अज्ञात तीन ते चार जणांनी अचानक त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत हल्लेखोर यांनी त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले.

No comments:

Post a Comment