भाई असल्याचे सांगत टोळक्याकडून 3 तरुणांवर कोयत्याने हल्ला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

भाई असल्याचे सांगत टोळक्याकडून 3 तरुणांवर कोयत्याने हल्ला.

 भाई असल्याचे सांगत टोळक्याकडून 3 तरुणांवर कोयत्याने हल्ला.


कॅम्प परिसरातील अझम कॅम्पसजवळील पूना काॅलेज गेट परिसरातील रस्त्यावर एका टाेळक्याने हातात काेयते घेऊन दहशत निर्माण केली. ‘अम्ही इथले भाई अहोत, अमच्या नादी लागू नका’ असे म्हणत तीन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. यात तिघेही जखमी झाले. या प्रकरणी अॅलेक्स गवळी व त्याच्या १० ते १५ साथीदारांवर लष्कर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

याबाबत अनिरुद्ध अनिल जगताप (२५, रा. कॅम्प ,पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली अाहे. सदरचा प्रकार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला अाहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुणे कॅन्टान्मेंट येथे अतिक्रमण विभागात कामास अाहे. सोमवारी रात्री तक्रारदार हे त्यांचा भाऊ पंकज जगताप, मित्र साहिल व काैस्तुभ हे बाेलत थांबलेले हाेते.

त्यावेळी पाच ते सहा दुचाकीवर अलेक्स गवळी व त्याचे १० ते १५ साथीदार तिथे अाले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना कोयत्याचा धाक दाखवून अडवले. ते पळू लागले तेव्हा पाठलागही केला. अाराेपी गवळी याने ‘यांना जिवंत साेडू नका, मारुन टाका‘ असे म्हणत जगताप याच्या डाेक्यात काेयत्याने मारुन गंभीर जखमी केले.

No comments:

Post a Comment