कर्णबधिर विद्यार्थ्यांना अलियावर जंग राष्ट्रीय संस्था मुंबई यांच्या मार्फत श्रवणयंत्र वितरण... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

कर्णबधिर विद्यार्थ्यांना अलियावर जंग राष्ट्रीय संस्था मुंबई यांच्या मार्फत श्रवणयंत्र वितरण...

 कर्णबधिर विद्यार्थ्यांना अलियावर जंग राष्ट्रीय संस्था मुंबई यांच्या मार्फत श्रवणयंत्र वितरण...


पारनेर -
मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर  यांच्या प्रेरणेने व भास्कर पाटील शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परीषद अहमदनगर महानगर पालिका अहमदनगर व अलियावर जंग राष्ट्रीय वाचा व श्रवण दिव्यांग संस्था मुंबई यांच्या संयुक्त विदयमानाने कर्णबधिर दिव्यांग विदयार्थ्यासाठी श्रवणयंत्र निदान व फिंटमेंट शिबीर आयोजित करण्यात आले.
जिल्हयातील ३४८  विदयार्थ्याना या शिबीराचा लाभ देण्यात येणार आहे या साठी श्री गोपाल शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे ६ तज्ञ उपस्थित आहेत सदर विदयार्थ्यांचे ASSESSMENT करुन त्यांना त्याच्या श्रवण-हासानुसार श्रवणयंत्रात Digital Programing करुन देणार आहे.
ज्यामुळे विदयार्थ्याचा श्रवणयंत्राचा  चांगला फायदा होऊ शकतो जिल्हयात विदयार्थी संख्या पाहता शिबीराचे नियोजन म.न.पा अहमदनगर नेवासा (ज्ञानोदय विदयालय) व संगमनेर येथिल रु.दा मालपाणी विदयालय
येथे करण्यात आले आहे प्राप्त  पारनेर तालुक्यातील १८  विद्यार्थ्यांची तपासणी झाली ऑडीओमेट्री करून त्यातील ७ विद्यार्थ्यांना ३८ हजार किमतीचे श्रवणयंत्र विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले. या वेळेस गटशिक्षणाधिकारी मा बुगे साहेब यांनी तालुका समावेशित टिम चे अभिनंदन केले यात जिल्हा समन्वयक श्रीम मोरे मॅडम , श्री पोळ सर , श्री भाटे सर यांचे सहकार्य लाभले. या श्रवणयंत्रामुळे विद्यार्थी व पालक चेहर्‍यावर हसू उमलले या श्रवणयंत्रा मुळे दिव्यांग विद्यार्थ्याच्या अध्ययन अध्यापनात निश्चित चांगला फायदा होणार आहे.

No comments:

Post a Comment