अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वादळी‎ वाऱ्यासह पावसाची हजेरी‎; वीज पडून‎ एकाचा मृत्यू‎.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 5, 2023

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वादळी‎ वाऱ्यासह पावसाची हजेरी‎; वीज पडून‎ एकाचा मृत्यू‎..

 अहमदनगर शहरासह जिल्ह्यात वादळी‎ वाऱ्यासह पावसाची हजेरी‎; वीज पडून‎ एकाचा मृत्यू‎..


अहमदनगर - 
नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध ‎ भागात रविवारी दुपारी वादळी‎ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. ‎ अकोले तालुक्यातील म्हाळादेवी ‎ ‎गावातील वाडा शिवारात रामदास ‎ ‎ लक्ष्मण उघडे (वय ५६) या ‎शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. ‎ ‎ दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे नगर‎ शहर व जिल्ह्याच्या विविध भागात‎ १६ ठिकाणी झाडे उन्मळून पडली.‎ तर शेकडो झाडांच्या फांद्या तुटून ‎ पडल्या.‎ नगर शहरात रविवारी दुपारी‎ वादळी वाऱ्यासह झालेल्या‎ पावसामुळे सहकार नगर तीन मंदीर‎ येथील ३० वर्षे जुने वडाचे झाड‎ उन्मळून पडले. तसेच इस्कॉन मंदीर‎ येथेही झाड पडले.

केडगाव व‎ सावेडी उपनगरात ठिकठिकाणी‎ झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.‎ महापालिकेच्या उद्यान विभागाचे‎ प्रमुख शशिकांत नजान, मुकादम‎ विजय कुलाळ, माळी, गणेश दाणे‎ व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून‎ पडलेली झाडे व फांद्या हटवल्या.‎ महावितरणच्या वीजवाहक‎ तारांचेही नुकसान झाले. नगर‎ शहरात दुपारपासून अनेक ठिकाणी‎ वीजपुरवठा खंडित झाला होता.‎

No comments:

Post a Comment