पारनेर-आळकुटी रोडवर टेम्पोची दुचाकीला धडक; 1 ठार 8 जखमी.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 14, 2023

पारनेर-आळकुटी रोडवर टेम्पोची दुचाकीला धडक; 1 ठार 8 जखमी..

 पारनेर-आळकुटी रोडवर टेम्पोची दुचाकीला धडक; 1 ठार 8 जखमी..


पारनेर -
पारनेर तालुक्यातील वडझीरे गावाचे शीवारात पारनेर ते आळकुटी रोडवर एका भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पो ने दुचाकीला धडक दिल्याने एक जणांचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पो मधील सात ते आठ जण जखमी झाले आहे. याबाबत टेम्पो चालका विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडझीरे गावाचे परिसरात आळकुटी रोडवर सोमवार दि.12 रोजी संध्याकाळी 5:45 च्या सुमारास कंपनीचा -उए मॉडेलचा टेम्पो नंबर एम.एच.12 क्यु.डब्लु.1691भरधाव वेगात चालवुन समोरुन येणारी एक्टीव्हा स्कुटी नं. एम.एच.16 बी.ए.8348 हीस जोराची धडक दिल्याने कुंडलीक किसन शिर्के, वय 65 वर्षे, यांचा मृत्यू झाला असून झुंबराबाई कुंडलीक शिर्के, रा.बाभुळवाडे ता. पारनेर टाटा कंपनीचा -उए  टेम्पो तील 7 ते 8 व्यक्ती नाव गाव माहित नाही. यात जखमी झाल्या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे याबाबत भास्कर नामदेव शिर्के, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबलव्ही.एस.लोणारे करत आहेत.


No comments:

Post a Comment