तोफखाना पोलीसांची कारवाई; खुनाच्या गुन्हयातील 2018 पासुन फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 14, 2023

तोफखाना पोलीसांची कारवाई; खुनाच्या गुन्हयातील 2018 पासुन फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या.

 तोफखाना पोलीसांची कारवाई; खुनाच्या गुन्हयातील 2018 पासुन फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेड्या.


अहमदनगर -
शहरातील सिध्दार्थनगर येथील खुनाच्या गुन्हयातील 2018 पासुन फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात तोफखाना पोलीसांना यश आले आहे.
तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं 280/2014 भादविक 302,307,363,364,34 प्रमाणे दि.03/06/2018 रोजी दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.गुन्हा घडल्या दिवसापासुन सदर गुन्हयातील आरोपी नामे रविंद्र कचरु पंडुरे (वय 30 रा.नेहुरगाव ता. गंगापुर) हा फरार होता.
तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक मधुकर साळवे यांना आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली पोनि.साळवे यांनी लागलीच अधिकारी व पथकातील कर्मचार्‍यांना कारवाई करण्यास सांगितले.पथकाने त्याचा शोध घेतला असता तो पैठण जिल्हा औरंगाबाद येथे राहत असलेल्या माहीती वरुन त्यास पैठण पोलीसांचे मदतीने ताब्यात घेवून त्यास नमुद गुन्हयात अटक केली.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, प्रशात खैरे अपर पोलीस अधीक्षक, अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना मधुकर साळवे, नितीन रणदिवे, विश्वास भान्सी, समाधान सोळंके, बुरकुल नेम पैठण पोलीस स्टेशन व त्यांचे तपास पथक तसेच तोफखाना पोस्टेचे संदिप धामणे,शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment