नगर तालुका पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला केले जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 24, 2023

नगर तालुका पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला केले जेरबंद.

 नगर तालुका पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला केले जेरबंद.


अहमदनगर :
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेत चांदबीबी महाल परिसरात तिच्यावर अत्याचार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला नगर तालुका पोलिसांच्या पथकाने अखेर ३ महिन्यांनी पकडले आहे. अनिकेत शहदेव लबडे (रा. भातोडी पारगाव ता. नगर) असे या आरोपी तरुणाचे नाव आहे.
नगर तालुक्यातील टाकळी काझी गावातील पिडीत मुलीच्या आईने दि.२३ मार्च २०२३ रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती की, तिच्या १५ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून राहत्या घरून मोटारसायकल वर बसवून पळवून नेले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर भा.दं.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या दिवशी सदर मुलगी नातेवाईकांनी शोधून काढली होती. तिने बालकल्याण समिती समोर दिलेल्या जबाबात अनिकेत शहदेव लबडे याने मला माझ्या राहत्या घरासमोर लग्नाचे अमिष दाखवून मला फुस लावून चॉदबीबी महाल येथे घेवून गेला व मला धमकावून अत्याचार केले तसेच झालेला प्रकार जर तु कोणाला सांगितला तर मी तुला व तुझ्या कुंटुबाला संपवून टाकेल अशी धमकी दिल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी अनिकेत वर अत्याचारासह पिडीत मुलगी ही अनुसुचित जाती जमातीतील असल्याने सदर गुन्ह्यामध्ये अ.जा. व अ.ज. अतर्गत वाढीव कलम लावण्यात आले होते. तेव्हापासून आरोपी फरार होता. 
पोलिस पथक त्याचा शोध घेत असताना स.पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी अनिकेत लबडे हा त्याच्या भातोडी पारगाव येथील राहते घरी आलेला आहे, ही माहिती मिळताच स.पो.नि. देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पो.कॉ.विशाल टकले, कमलेश पाथरुट, संभाजी बोराडे यांचे पथकाला सदर आरोपी पकडण्यासाठी रवाना केले. या पथकाने भातोडी पारगाव येथे जावून सदर आरोपी हा त्याच्या घराच्या पाठीमागच्या दरवाजातून पळून जात असतांना त्यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेत त्याला अटक केली आहे.

No comments:

Post a Comment