नांदूर पठार गाव बंद! ह. भ. प. भागा महाराज घोलप यांना झालेली मारहाण प्रकरण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 15, 2023

नांदूर पठार गाव बंद! ह. भ. प. भागा महाराज घोलप यांना झालेली मारहाण प्रकरण.

 नांदूर पठार गाव बंद! ह. भ. प. भागा महाराज घोलप यांना झालेली मारहाण प्रकरण.

निषेध मोर्चाचे आयोजन!


पारनेर -
नांदूर पठार येथील वारकरी संप्रदायाचे पाईक ह.भ.प भागा महाराज घोलप यांना आळंदी येथे पंढरपूर वारी साठी गेले असता आळंदी येथे घडलेल्या घटनेत महाराजांना मारहाण झाल्याने ते जखमी असुन अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेध नोदवण्यासाठी नांदूर पठार ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेऊन निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.     
आळंदी ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यासाठी नांदूर पठार येथील विणेकरी बाबा महाराज घोलप हे नित्य नियमाप्रमाणे यंदाही आळंदी येथे गेले होते. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान आळंदी येथे मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठी मारीत पारनेर तालुक्यातील नांदूर पठार येथील भागा महाराज घोलप हे गंभीर जखमी झाले होते.त्यांच्या डोक्यात मार लागल्याने त्यांची मानसिक संतुलन बिघडले असून नगर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्या डोक्याचे बुधवारी स्कॅन करण्यात आले.
रविवारी माऊलींच्या पालखी प्रदक्षिणा दरम्यान नित्यसेवक म्हणून सेवा देणारे विद्यार्थी निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवले .त्यानंतर पोलीस वारकऱ्यांमध्ये धुमचक्री उडाली. या सर्वांमध्ये पास आणि दिंडी या दोन गोष्टी नसल्याने त्यांना प्रवेशने येण्यास नकार देण्यात आला. दरवर्षी प्रवेश देण्यात येतो यंदा का नाही असे म्हणत वारकरी विद्यार्थी आक्रमक झाली. आणि ढकला ढकली  सुरू झाली पोलिसांना दूर सारून विद्यार्थी महाद्वारा कडे जाण्यासाठी धावू लागली. पोलिसांनी त्यांना रोखणे अशक्य झाल्याने लाठीमार सुरू झाला. त्यातच ह भ प बाबा महाराज घोलप हे सापडले त्यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागला तसेच पाठीवर काठीचे व्रण  उठले आहेत. हबप भागा महाराज  गंभीर जखमी अवस्थेत असताना त्यांना नांदूरपठार येथे आणण्यात आले. त्यांना टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने बुधवारी त्यांना नगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. झालेल्या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी नांदुर पठार ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेऊन निषेध व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment