दिव्यांगाचे हयातीचे दाखले तलाठी, ग्रामसेवक यांचे कडून मिळावेत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 13, 2023

दिव्यांगाचे हयातीचे दाखले तलाठी, ग्रामसेवक यांचे कडून मिळावेत.

 दिव्यांगाचे हयातीचे दाखले तलाठी, ग्रामसेवक यांचे कडून मिळावेत.

आ. निलेश लंके अपंग बहुउद्देशीय कल्याणकारी प्रतिष्ठानचे तहसिलदार यांना निवेदन.


पारनेर -
शासनाच्या पेन्शन योजनाच्या संजय गांधी निराधार पेन्शन योजना, संजय गांधी अपंग योजना, श्रावण बाळ योजना, या करिता जे हयातीचे दाखले बँकेत, तहसील कार्यालयात जाऊन द्यावे लागतात. त्या दाखल्यांसाठी जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना घेउन जाणे शक्य नसते. त्या मुळे जेष्ठ नागरिक व दिव्याग व्यक्ती यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. या करीता दिव्यांगचे हयातीचे दाखले प्रत्येक गावातील तलाठी व ग्रामसेवक यांचे माध्यमातुन घेण्यात यावे या बाबतचे लेखी निवेदन पारनेरचे तहसिलदार सुभाष कदम यांना आधार दिव्यांग बहुद्देशीय कल्याणकारी ट्रस्ट व आ. निलेश लंके अपंग  प्रतिष्ठानचे वतीने देण्यात आले. या वेळी आ. निलेश लंके अपंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल करंजुले, महीला अध्यक्ष सुनीता वाळेकर, अनिल तांबे, अश्रफ शेख, जुबेर शेख, जावेद मोमीन, तुषार कुबडे, भानुदास आंग्रे, नंदू डोळ, व आधार दिव्यांग ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या पेन्शन योजनाच्या संजय गांधी निराधार पेन्शन योजना, संजय गांधी अपंग योजना, श्रावण बाळ योजना या करिता जे हयातीचे दाखले बँकेत, तहसिलदार कार्यालयात जाऊन द्यावे लागतात त्या दाखल्यांसाठी जेष्ठ नागरिक व दिव्याग यांना वेळोवेळी घेउन जाणे शक्य नसते. त्यात सर्वच गावात बसेस चालु नाहीत. त्या मुळे जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांचे मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. तरी शासनाचे आता सुरु केलेल्या शासन आपल्या दारी या मध्ये प्रत्येक गावातील शासनाचे जे कर्मचारी असतात. त्या पैकी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक, पोलीस पाटील यांना त्या त्या गावातील जेष्ठ नागरिक व दिव्यांग यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना गावात बोलवून त्यांचे हयातिचे दाखले तिथेच पडताळून घावेत. व शासन आपल्या दारी अभियानातून जेष्ठ नागरिक व दिव्यांग यांची होणारी हेळसांड थांबवावी अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment