टायर फुटल्याने दुभाजक तोडून भरधाव कारची दुचाकीला धडक, 2 ठार.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

टायर फुटल्याने दुभाजक तोडून भरधाव कारची दुचाकीला धडक, 2 ठार..

 टायर फुटल्याने दुभाजक तोडून भरधाव कारची दुचाकीला धडक, 2 ठार..


नाशिक -
त्र्यंबकेश्वररोडवरील हॉटेल संस्कृतीसमोर टायर फुटल्याने दुभाजक तोडून कारने दुचाकीवरील दोघांना धडक दिल्याने दोन युवक जागीच ठार झाले.

अपघातग्रस्त कार त्र्यंबकहून नाशिककडे चालली होती तर दुचाकीस्वार नाशिकहून त्र्यंबककडे चालले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. नामदेव विठ्ठल शीद (३६, रा. राजेवाडी) व सुनील मनोहर महाले (२६, रा. वाढोली) अशी अपघातात मृत झालेल्या युवकांची नावे असून हा अपघात सीसीटीव्हीतदेखील कैद झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे वेगाने येणाऱ्या होंडा सिटी कारचे टायर फुटल्याने कार थेट रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला आली. याचवेळी नाशिककडून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी दोन दुचाकींना तिने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचा आवाज एेकून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीने कार विरुद्ध दिशेने येत असल्याचे बघून पळ काढल्यामुळे थोडक्यात बचावला. अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही गंभीर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. 

मृत तरुण स्वराज्य संघटनेचा पदाधिकारी या अपघातात मृत झालेले सुनील महाले हे स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली तर नामदेव शीद यांच्या पश्चात पत्नी व पाच अपत्ये असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच स्वराज्य संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख करण गायकर व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

No comments:

Post a Comment