न्यू इंग्लिश स्कूल पारनेर विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 21, 2023

न्यू इंग्लिश स्कूल पारनेर विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा....

 न्यू इंग्लिश स्कूल पारनेर विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा....



पारनेर -
पारनेर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्येच्या न्यू इंग्लिश स्कूल , पारनेर विद्यालयात बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्याक्रमासाठी पारनेर पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे विषयतज्ञ श्री किसन शिरसाट साहेब हे प्रमुख पाहुणे होते . जागतिक योगदिना निमित्त तिखोल येथील योगाचार्य सुभेदार श्री गणपत ठाणगे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले . या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळासाहेब करंजुले सर , उपप्राचार्य श्री संजय कुसकर सर , पर्यवेक्षक श्री अंकुश अवघडे सर, क्रिडा शिक्षक श्री बापूराव होळकर सर, समन्वयक श्री अजित दिवटे सर, जेष्ठ शिक्षक श्री जयवंत पुजारी सर, श्री संतोष पारधी सर , श्री संदिप लंके सर, श्रीमती मनिषा गाडगे, श्रीमती निर्मला सोबले, श्रीमती जुलेखा शेख यांच्या हस्ते योगा शिक्षक व प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला.
क्रिडा शिक्षक श्री बापूराव होळकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन जागतिक योग दिनाचा इतिहास सांगितला. उपप्राचार्य श्री संजय कुसकर सर यांनी पाहुण्यांचा परीचय सांगितला.
योगाचार्य सुभेदार श्री गणपत ठाणगे यांनी योगासनांचे विविध प्रकार व त्यांचे प्रात्यक्षिक सादर करून सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी योगासनांच्या प्रात्यक्षिकांमध्ये उस्फुर्त पणे सहभाग घेतला . त्यांनी प्रत्येक योगासने व त्याचे आपल्या आरोग्याला काय फायदे होतात याची सविस्तर माहिती सांगून आपल्या दैनंदिन जीवनात तणावमुक्त व आनंदी जीवन जीवन जगण्यासाठी ही योगांसने करावीत असे अहवान केले .आपल्या अध्यक्षिय भाषणात प्राचार्य श्री बाळासाहेब करंजुले सर यांनी जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन योगा ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे असे सांगितले .आपल्या ऋषीमुनींनी जोपासलेली योगा साधना व या योगासनांच्या माध्यमातून आपण निरामय जीवन प्राप्त करू शकतो त्यामुळे योगासनांना आपल्या जीवन शैलीचा भाग बनवण्याचा संकल्प करावा असे सर्वांना अहवान केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शर्मिला मगर मॅडम व श्रीमती मंगल बनकर मॅडम यांनी केले . तर आभार कलाशिक्षक श्री ज्ञानेश्वर कवडे सर यांनी मानले . जागतिक योग दिन यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी , शिक्षकवृंद व सेवकवृंद यांनी परिश्रम व सहकार्य केले.

No comments:

Post a Comment