पारनेर तालुका खरेदी विक्री संघावर भाजपा व शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 5, 2023

पारनेर तालुका खरेदी विक्री संघावर भाजपा व शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व...

 पारनेर तालुका खरेदी विक्री संघावर भाजपा व शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व...


पारनेर -
पारनेर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपने १५- ० ने दणदणीत विजय मिळविला. यात महा विकास आघाडीला अनपेक्षित पने पराभवाला सामोरं जावे लागले.. 
तालुक्यात खरेदी विक्री संघाच्या निवडणुका यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. ही निवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू होते परंतु, मात्र यावेळेस प्रथमच ही निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली होती. बाजार समितीतील विजयाने महाविकास आघाडी खरेदी विक्री संघाची निवडणूक सहज जिंकेल अशी परिस्थिती असताना मतदारांनी महाविकास आघाडीला सपशेल नाकारले आमदार नीलेश लंके यांनी स्वतः लक्ष घातल्याने बाजार समिती निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडी या निवडणुकीत एकतर्फी यश मिळवेल, असा जाणकारांचा अंदाज होता. परंतु भाजपने महाविकास आघाडीला कडवे आव्हान दिले. बाजार समितीत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक भाजपने योग्य नियोजन करत हाताळली आणि विजय संपादन केला. बाजार समितीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वखाली जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, यांनी निवडणुकीसाठी व्यूहरचना केली होती. आणि भाजप निवडणुकीला सामोरे गेली. महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके, माजी आमदार विजय औटी, माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली  महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. निलेश लंके प्रतिष्ठानने बाजार समितीप्रमाणेच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतही सूक्ष्म नियोजन केले असे सांगितले जात होते त्यामुळे महाविकास आघाडी ही निवडणूक सहज जिंकेल असे भासवले गेले परंतु मतदारांच्या मनातील ओळखण्यात महाविकास आघाडी चुकली आणि भाजपला तालुक्यात विजयाचे द्वार खुले झाले.
खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप प्रणीत जनसेवा पॅनलचे विजय उमेदवार व त्यांना मिळालेली मते
सेवा सोसायटी मतदारसंघ : बाजीराव रामचंद्र अलभर ६९, प्रमोद बबनराव कावरे ७०, सुनील बाळू पवार ६१, संग्राम बाळासाहेब पावडे ६९, सतीश राजाराम पिंपरकर ७२, दत्तात्रय राजाराम रोकडे ६४, गंगाधर भानुदास रोहकले ६४, प्रसाद भरत शितोळे ६३. वैयक्तिक मतदार संघ : शैलेश संपत औटी १२४, रघुनाथ माधवराव खिलारी १३९, महिला मतदारसंघ ज्योती संदीप ठुबे २१६, रेखा संजय मते २०६, इतर मागास प्रवर्ग : अण्णा बबन शिंदे २१०. भटक्या विमुक्त जाती जमाती : भाऊसाहेब महादु मेचे २००. अनुसूचित जाती मतदारसंघ मधुकर हरिभाऊ पठारे २१८ मते.

सत्तेचा कोणी ताम्रपट घेऊन आले नाही : सुजित झावरे
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. काहींना असे वाटते की सत्तेमधील आम्ही जादूगार आहोत परंतु त्यांचा हा गोड गैरसमज आहे. सत्तेचा कोणीही ताम्रपट घेऊन आलेले नाही. पारनेर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत याचा प्रत्यय आला आहे खासदार सुजय दादा विखे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन करत भाजपने ही निवडणूक जिंकली आहे. बाजार समितीच्या पराभवाचा वाचपा काढण्यात आम्ही यशस्वी ठरलो.

No comments:

Post a Comment