किरकोळ वादातून हाणामारी अन् एकाची हत्या... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 8, 2023

किरकोळ वादातून हाणामारी अन् एकाची हत्या...

 किरकोळ वादातून हाणामारी अन् एकाची हत्या...


नाशिकमधील पंचवटीत एका व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार सितागुफा येथील आहे. मोहमद्द साहेब बाबू मोहमद्द मसुर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कॉलेज रोडवरील एका टेलर कारखान्यात तो काम करत होता.

मंगळवारी सितागुंफा रोड वर एका व्यक्तीमध्ये वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हाणामारीत मयत व्यक्तीच्या हाताला गंभीर दुखापत होती. दुखापत झाले असता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दुखापतीमध्ये हातातून अती रक्तस्त्राव झाला होता.
पुढील उपचारासाठी बाबू यास मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान काल (बुधवार) रोजी उपचारादरम्यान बाबू यांस मयत घोषित करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

No comments:

Post a Comment