सावेडी नाका येथील शोरूम मधून तीन चाकी, दुचाकी व गिअर सायकल चोरणारा जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 8, 2023

सावेडी नाका येथील शोरूम मधून तीन चाकी, दुचाकी व गिअर सायकल चोरणारा जेरबंद.

 सावेडी नाका येथील शोरूम मधून तीन चाकी, दुचाकी व गिअर सायकल चोरणारा जेरबंद.

पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची कारवाई.


अहमदनगर - 
सावेडी नाका येथील एका प्रसिद्ध शोरूम मधून 3 लाख आठ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी व एक गिअरची सायकल चोरणार्‍या चोरट्यास तोफखाना पोलिसांनी बारा तासाच्या आत अटक केली. सागर सिताराम कसपटे(वय 19 रा. गजानन कॉलनी एमआयडीसी) याने शोरूम मधून दुचाकी व एक सायकल चोरल्याची कबुली दिली असून अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
बातमीतील हकीकत आशिकी दि.5 जुन रोजी सावेडी नाका येथील सुझुकी मिडास शोरूम मधून एका अनोळखी इसमाने तीन मोटरसायकल व एक गिअरची सायकल चोरी केली आहे,याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे गूरन 835/2023 भादविक 379 प्रमाणे दि.7 जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदरील चोरटा इसम हा गजानन कॉलनी एमआयडीसी येथील आहे.पोलीस निरीक्षक साळवे यांनी गुन्हे शोध पथकाला याबाबत तात्काळ माहिती देऊन संबंधित इसमावर कारवाई करण्याबाबत सांगितले.गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी तात्काळ सापळा रचून संबंधित इसमाला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अनिल कातकडे,तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाट,अविनाश वाकचौरे,संदीप धामणे वसीम पठाण,अहमद इनामदार,सुरज वाबळे, सतीश त्रिभुवन,सचिन जगताप,शिरीष तरटे,संदीप गिरे,गौतम सातपुते,दत्तात्रय कोटकर,सतीश भवर यांनी केली आहे.
अत्यंत कमी किमतीत व विना कागदपत्रे असलेली संचयित मोटरसायकल विक्री करताना आढळून आल्यास पोलीस ठाण्यास संपर्क करावा.अशा मोटर सायकल विकत घेऊ नये चोरीची मोटरसायकल विकत घेणारे समोर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद स्थानिक दुचाकी खरेदी विक्री करणार व इतर दुकानदारांनी घ्यावी.

No comments:

Post a Comment