दोघा मित्रांनी पैशांसाठी केला मित्राचा खून‎.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 8, 2023

दोघा मित्रांनी पैशांसाठी केला मित्राचा खून‎..

 दोघा मित्रांनी पैशांसाठी केला मित्राचा खून‎..


लासलगाव - दारूच्या आहारी गेलेल्या रामदास‎ सालकाडे व सुनील मोरे या दोघा मित्रांनी पैशांच्या‎ लालसेने बाळासाहेब पोतले या मित्राचा गळा‎ आवळून खून केल्याची घटना विंचूर येथे घडली.‎ दोघाही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.‎ निफाड न्यायालयाने त्यांना ९ जून पर्यंत कोठडी‎ सुनावली विंचूर येथील पांडुरंगनगरमध्ये तिघेही‎ पोतले यांच्या घरात दारू पिण्यासाठी एकत्र आले‎ होते. तेथे वादानंतर या दोघांनी मिळून पोतले यांना‎ पलंगावर जोरात ढकलून दिले व नाकतोंड दाबून‎ धरत त्यांना मारले. मोबाईल, रोख, एटीएम कार्ड,‎ चेकबुक तसेच मारुती कारसह पलायन केले होते.

No comments:

Post a Comment