बसस्थानकावरून 2 लाख 15 हजाराचे सोने लंपास. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 17, 2023

बसस्थानकावरून 2 लाख 15 हजाराचे सोने लंपास.

 बसस्थानकावरून 2 लाख 15 हजाराचे सोने लंपास.


नाशिक -
येथील नवीन बसस्थानकावर भडगाव (जि. जळगाव) येथील वृध्द दाम्पत्याला चकवा देत त्यांच्याकडील पिशवीतून दोन लाख १५ हजार रुपयाचे सोने चोरट्यांनी लांबविले.

याप्रकरणी प्रशांत कोतकर (वय ४७, रा. नाशिक) यांच्या तक्रारीवरून आयशानगर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. बसस्थानकात प्रवाशाच्या बॅगा, पर्स, मोबाईल व इतर वस्तू चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

कोतकर यांचे आई, वडील पाचोरा ते पालघर या बसने प्रवास करीत होते. सदर बस येथील नवीन बसस्थानकावर आली असता बाळकृष्ण कोतकर हे कामानिमित्त खाली उतरले.

ते पुन्हा बसमध्ये परत आले असता त्यांना शीटखाली ठेवलेली बॅग मागे सरकलेली दिसली. त्यांनी तत्काळ बॅगेची तपासणी केली असता बॅगेतून चोरट्यांनी दोन लाखाचे ४४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील कुंडल व पाच हजाराचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी असा एकूण २ लाख १५ हजाराचा ऐवज चोरुन नेल्याचे लक्षात आले. सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला.

No comments:

Post a Comment