पशुसंवर्धन’चा लाचखोर सहायक आयुक्त‎ एसीबीच्या जाळ्यात‎.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 17, 2023

पशुसंवर्धन’चा लाचखोर सहायक आयुक्त‎ एसीबीच्या जाळ्यात‎..

 पशुसंवर्धन’चा लाचखोर सहायक आयुक्त‎ एसीबीच्या जाळ्यात‎..


अकोला‎ -
 लम्पी आजाराने दगावलेल्या‎ जनावरांची नुकसान भरपाई मंजूर‎ करण्यासाठी अकोला पशुसंवर्धन‎ विभागाचा सहायक आयुक्त डॉ.‎ प्रवीण नारायण राठोड व खासगी‎ इसम राजीव शंकरराव खाडे याला‎ आठ हजार रुपयांची लाच घेताना‎ रंगेहाथ पकडले. ही कारवाई अकोला‎ लाचलुचपत प्रतिबंधक‎ विभागाने(एसीबी) शुक्रवारी रात्री‎ केली.‎ मलकापूर मधील मयुर कॉलनी‎ येथील तक्रारकर्ते यांची कालवड‎ आणि एका गोऱ्याला जीवघेणा लम्पी‎ आजार झाला होता. त्यात दोन्ही‎ जनावरे दगावली होती.

दगावलेल्या‎ जनावरांची नुकसान भरपाई म्हणून‎ प्रती जनावर १६ हजार रूपये देण्याचा‎ शासन निर्णय होता. त्यानुसार‎ तक्रारदार यांनी पशुसंवर्धन‎ विभागाकडे नुकसान भरपाई मिळावी‎ म्हणून अर्ज केला होता. त्यांना ३२‎ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली‎ होती . रक्कम मंजूर करून दिली‎ त्याबदल्यात प्रवीण राठोड याने दहा‎ हजार रुपयांची मागणी केली होती.‎ तडजोडीअंती ही रक्कम आठ हजार‎ रुपयांवर आली होती. मात्र,‎ तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने‎ त्याने अकोला एसीबीकडे गुरुवारी‎ तक्रार केली होती.‎ एसीबीचे पोलिस उपअधीक्षक‎ शैलेश सपकाळ यांनी पंचासमक्ष‎ पडताळणी करून शुक्रवारी सापळा‎ रचला.

या सापळ्यात पशुसंवर्धन‎ सहायक आयुक्त डॉ. प्रवीण राठोड‎ याच्या वतीने राजीव शंकरराव खाडे‎ हा आठ हजार रुपयांची लाच घेताना‎ अडकला.‎ रात्री उशिरा या प्रकरणी दोंघाविरुध‎ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू‎ होती. ही कारवाई एसीबीचे पोलिस‎ उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या‎ मार्गदर्शनात करण्यात आली.‎ शासकीय, निमशासकीय‎ अधिकारी लाचेची मागणी करीत‎ असतील तर त्यांची तक्रार करावी,‎ तक्रारकर्तांचे नाव गोपनीय ठेवण्यात‎ येईल, असे आवाहन एसीबीचे‎ पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ‎ यांनी केले आहे.‎

No comments:

Post a Comment