कोतवाली पोलिसांची कारवाई; बुथ हॉस्पिटल परिसरात गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 5, 2023

कोतवाली पोलिसांची कारवाई; बुथ हॉस्पिटल परिसरात गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद.

 कोतवाली पोलिसांची कारवाई. बुथ हॉस्पिटल परिसरात गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद.


अहमदनगर -
नगर मधील बुथ हॉस्पिटल परिसरात कमरेला गावठी पिस्तोल लावून संशयास्पदरीत्या उभा असलेल्या दत्तात्रय शामराव काळे (वय 41 वर्ष लोखंडी कॉल जवळ नेवासा) या इसमास कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुस असा 32,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन मध्ये अधिनियम 3/25 प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोनि चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोसई गजेंद्र इंगळे हे करीत आहे.
सदर घटनेची हकीकत आशि की, काल रात्री कोतवाली पोलीसांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, बुथ हॉस्पीटल परिसर, अहमदनगर येथे एका इसमाच्या कंबरेला गावटी पिस्तोल लावलेले असुन तो तेथे संशयितरित्या उभा आहे. आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जावुन प्राप्त बातमी मिळाल्याप्रमाणे खात्री करुन कारवाई करणेस सांगीतले.
सदर ठिकाणी जावून खात्री करता तेथे एक इसम हा बातमीतील हकीगती प्रमाणे संशयितरित्या फिरतांना दिसला. त्याची पोलीस अंमलदारांनी खात्री करुन त्यास सुरक्षितरित्या ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला उजव्या बाजुला एक काळया रंगाचे लोखंडी अग्नीशस्त्र (गावठी पिस्तोल) व त्याचे मॅग्झीनमध्ये तीन जिवंत काडतुसे असे एकुन 32,100/-रु किंमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव दत्तात्रय शामराव काळे असे सांगितले असता त्याला जेरबंद करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मनोज कचरे, गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, सलीम शेख, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे, सतिष शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment