धारदार शस्त्राने तरूणावर वार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 6, 2023

धारदार शस्त्राने तरूणावर वार.

 धारदार शस्त्राने तरूणावर वार.


कशासाठी गर्दी जमल्याची विचारणा केल्याच्या रागातून एकाला आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण करुन धारदार शस्त्राने हल्ला चढवत जखमी केले.
सुप्रिम कॉलनीतील ममता बेकरीजवळ घडलेल्या या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कॉलनीत नवनाथ मंदिराजवळ राहूल संजय काकडे (वय २२) परिवारासह वास्तव्याला आहे. रात्री नऊला ममता बेकरीजवळून राहूल काकडे दुचाकीने जात होते. त्यावेळी तेथे गर्दी दिसल्याने त्यांनी थांबून गर्दी का जमली, असे विचारले.

त्याचा राग आल्याने गर्दीतील आठ ते दहा जणांनी राहूलला धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले. तसेच, त्यांची दुचाकी (एमएच १९, सीएम ८७९८)चेही नुकसान केले.

राहुल यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक महेंद्रसिंग पाटील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment