नगर मधील घटना; लिव इन रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या युवतीशी लग्न करण्यास दिला नकार, युवकाविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 10, 2023

नगर मधील घटना; लिव इन रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या युवतीशी लग्न करण्यास दिला नकार, युवकाविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल.

 नगर मधील घटना; लिव इन रिलेशनशीपमध्ये राहणार्‍या युवतीशी लग्न करण्यास दिला नकार, युवकाविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल.


नगर -
दोन वर्ष लिव इन‎ रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या युवतीशी‎ लग्न करण्यास युवकाने नकार दिल्याने‎ त्या युवतीने कोतवाली पोलिस ठाण्यात‎ दिलेल्या फिर्यादीवरून सोहेल उबेद‎ पठाण (वय २१ रा. वाळकी ता. नगर)‎ या युवकाविरूध्द अत्याचाराचा गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎

पीडित युवती ही एका खासगी‎ ठिकाणी कामाला होती. त्यावेळेस‎ २०२१ मध्ये सोहेल पठाण याच्याशी‎ तिची ओळख झाली. या ओळखीचे‎ रूपांतर प्रेमात झाले. सोहेल याने‎ लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर‎ अत्याचार केला. तिला गर्भपात‎ करण्यास बळजबरीने प्रवृत्त केले.‎ दरम्यान, दोघेही कल्याण‎ महामार्गावरील एका उपनगरामध्ये‎ काही महिने भाड्याने घर घेऊन लिव‎ इन रिलेशनशीपमध्ये राहिले. त्यानंतर‎ अरणगाव (ता. नगर) येथेही काही‎ महिने भाड्याने घर घेऊन लिव इन‎ रिलेशनशीपमध्ये राहत होते. युवती‎ गर्भवती राहिल्यावर पुन्हा गर्भपात‎ करण्यासाठी तिला मारहाण केली.‎ जास्त दिवसांचा गर्भ झाल्याने तिने‎ गर्भपात करण्यास नकार दिला. त्यामुळे‎ तिला घरातून बाहेर काढण्यात आले.‎ ती पुन्हा माहेरी आईकडे राहण्यास‎ आली. एका शासकीय रूग्णालयात‎ तिने एका बाळाला जन्म दिला.‎ त्यानंतरही पठाण याने लग्न करण्यास‎ नकार दिल्याने पीडित युवतीने पठाण‎ याच्याविरूध्द फिर्याद दिली.‎

No comments:

Post a Comment