सात जणांकडून पती- पत्नीसह‎ तिघांवर चाकूने वार, दोघे गंभीर‎. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 10, 2023

सात जणांकडून पती- पत्नीसह‎ तिघांवर चाकूने वार, दोघे गंभीर‎.

 सात जणांकडून पती- पत्नीसह‎ तिघांवर चाकूने वार, दोघे गंभीर‎.


देवळाली येथे सहा ते सात‎ अनोळखी व्यक्तींनी पती, पत्नीसह एकाला मारहाण करत दोघांवर चाकूने वार केला. जखमींवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार‎ सुरू असून ही घटना शुक्रवारी अडीचच्या सुमारास घडली.‎ देवळाली येथील आरगडे वस्ती येथे विकास ‎आरगडे व सुरेखा आरगडे हे पती-पत्नी‎ घराबाहेर झोपले होते. रात्री अडीचच्या‎ सुमारास सहा ते सात अनोळखी व्यक्तींनी‎ धारधार शस्त्रांनी हल्ला केला.

यावेळी त्यांच्या‎ पत्नी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही चाकूचा धाक दाखवत गळ्यातील सोने काढून ‎घेतले. यावेळी तेथेच शेजारी गोठ्यात झोपलेले ‎ शहाजी आरगडे विकास आरगडे यांना ‎ वाचवण्यासाठी आले असता त्यांनी शहाजी ‎ यांच्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात‎ विकास व शहाजी आरगडे हे गंभीर जखमी‎ झाले. त्यांना बार्शी येथील खासगी रुग्णालयात‎ उपचारासाठी दाखल केले. परंतु, दोघांच्या‎ पोटात गंभीर वार झाल्याने बार्शी येथील‎ डॉक्टरांनी दोन्ही गंभीर रुग्णांना सोलापूर येथील‎ रुग्णालयात येथे पुढील उपचारासाठी पाठवले.‎

याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी‎ दिनकर डंबाळे, परंडा पोलिस ठाण्याचे‎ निरीक्षक भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेत‎ घेतली. श्वान पथक पाचारण केले. यावेळी‎ श्वान घटनास्थळापासून देवळालीकडे ५००‎ मीटर अंतरावर येऊन घुटमळले. याप्रकरणी‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎

No comments:

Post a Comment