कर्जत बाजार समितीचे ११ जून रोजी कामकाज बंद; समान संचालकामुळे कोण होणार सभापती? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 10, 2023

कर्जत बाजार समितीचे ११ जून रोजी कामकाज बंद; समान संचालकामुळे कोण होणार सभापती?

 कर्जत बाजार समितीचे ११ जून रोजी कामकाज बंद; समान संचालकामुळे कोण होणार सभापती?


कर्जत -
कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत च्या सभापती व उपसभापतीची निवड दि. ११ जून रोजी कर्जत बाजार समितीच्या मुख्यालयातील समितीचे सभागृहात होणार आहे. सकाळी ८.०० वा. पासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत बाजार समिती मध्ये सर्व शेतमाल खरेदी विक्री कामकाज बंद राहणार आहे. बाजार समितीचे परवानाधारक आडते व्यापारी, जनरल कमीशन एजेंट, हमाल मापाडी शेतकरी या सर्व बाजार घटकांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासक साहेबराव पाटील व सचिव सतीश कदम यांनी केले आहे.
कर्जत बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडीसाठी मोठी चुरस असून आ. राम शिंदेचे नऊ तर आ. रोहित पवार यांचे नऊ संचालक निवडून आल्याने कोणाचा सभापती होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे सर्व संचालक सहली वर गेलेले असून कोणी फुटेल अशी शक्यता खूप कमी असली तरी राजकारणात काहीही अशक्य नसते त्यामुळे ऐनवेळी काही चमत्कार होतो काय याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे. राम शिंदे यांच्या गटातील शिवसेना तालुका प्रमुख बळीराम यादव यांच्या वर मोठा दबाव असल्याची चर्चा असून आ. रोहित पवार यांच्या बरोबरचे काँग्रेसचे दोन संचालक ही ऐनवेळी काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का यावर चाचपणी सुरू आहे. दोन्ही गटांचे समान संचालक असल्याने एखादा संचालक गैर हजर राहिला तरी पारडे विरोधी गटाकडे झुकू शकते त्यामुळे दोन्ही गटाची अत्यंत गुप्त रणनीती आखली जात असून निवडी पर्यत कोणाला सभापती उपसभापती पदासाठी संधी दिली जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आ. राम शिंदेच्या पॅनलला ईश्वर चिठ्ठीने साथ दिल्याने त्याचा सभापती तर आ. रोहित पवार यांच्या पॅनलचा उपसभापती झाला असल्याने कर्जत बाजार समिती बाबत उत्सुकता ताणली गेली असून जामखेड बाजार समिती निवडणुकी नंतर आ. राम शिंदे यांनी थेट विखे वर शरसंधान साधल्याने मोठे काहूर माजले होते त्याचे काही पडसाद कर्जतच्या निवडीत उमटतात का याबाबत चर्चेला उधाण आले असल्याने या निवडीना विशेष महत्व आले आहे.

No comments:

Post a Comment