महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एम.पी.एल क्रिकेट स्पर्धेसाठी जयंत येलुलकर यांची क्यूरेटर पदी नियुक्ती. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 9, 2023

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एम.पी.एल क्रिकेट स्पर्धेसाठी जयंत येलुलकर यांची क्यूरेटर पदी नियुक्ती.

 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एम.पी.एल क्रिकेट स्पर्धेसाठी जयंत येलुलकर यांची क्यूरेटर पदी नियुक्ती.


अहमदनगर - 
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित इंडियन प्रीमिअर लीग च्या धर्तीवर एमसीएचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा थरार रंगणार असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी एमसीए चे माजी मॅ्नेजिंग कमिटी सदस्य जयंत येलुलकर यांची क्युरेटर या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आ.श्री. रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी एम.पी.एल च्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्री.सचिन मुळे व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
एम.पी.एल क्रिकेट स्पर्धा  पुणे येथील गहूंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर येत्या 15 जुन पासुन सुरु होणार असुन स्पर्धेत राज्यातील दिग्गज व प्रतिभावान खेळाडूंचा सहभाग असणार आहे. स्पर्धेसाठी क्रिकेट खेळपट्टी व मैदानाची महत्वाची जबाबदारी येलुलकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
येलुलकर यांनी यापूर्वी एमसीए मॅनेजिंग कमिटी सदस्य, अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव,नगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती पदाची धुरा समर्थपणे सांभाळली असून त्यांच्या कार्य काळात अनेक महत्वाच्या स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत.एमसीए च्या मॅनेजिंग कमिटी सदस्य पदावर असताना राष्ट्रीय,आंतर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत येलुलकर यांनी आपला ठसा उमटविला आहे.  
जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ग्रामीण खेळाडूंच्या गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी येलुलकर यांच्या पुढाकाराने प्रत्येक तालुक्यात तालुका क्रिकेट असोसिएशनची स्थापना करीत त्यांनी खेळाडूंच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले.तालुका क्रिकेट असोसिएशनची स्थापना हा राज्यांतील पहिला क्रांतिकारी निर्णय होता.येलुलकर यांनी वाडीया पार्क स्टेडियमच्या विकासात तसेच तसेच गहूंजे, पुणे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या उभारणी वेळी समन्वयक व स्टेडियम समिती सदस्य म्हणून आपले बहुमोल योगदान दिले असुन त्यांच्या या योगदानाबद्दल बी.सी.सी.आय चे तत्कालीन अध्यक्ष खा.श्री शरद पवार यांच्या शुभ हस्ते येलुलकर यांचा खास गौरव करण्यात आला होता.
येलुलकर यांच्या नियुक्ती बद्दल क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment